ज्ञानविकास विद्यालयात जनजागृती करुन भ्रष्टाचार विरोधी दिवस

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नैतिकतेचे महत्त्व रुजवणूक, भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम समजावून त्यांना भ्रष्टाचारमुक्त समाजाचे निर्माते बनण्यास प्रोत्साहित करणे, विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यालयाचे सहशिक्षक एस. यू. शिंदे यांनी भ्रष्टाचार संबंधी सांगताना विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि समाजात पसरणारे नकारात्मक परिणाम स्पष्ट
आवाज उठवण्यासाठी आणि समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी विद्यालयात हा दिवस साजरा केल्याने विद्यार्थ्यांना भविष्यात एक जबाबदार नागरिक बनण्यास मदत होईल जेणेकरून ते भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि न्यायपूर्ण समाजाच्या निर्मितीमध्ये केले.

 शिवाय लहान वयापासूनच प्रामाणिकपणा, सचोटी आणि जबाबदारीची भावना, विद्यार्थ्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध योगदान देऊ शकतील. सहभागी विद्यार्थी हर्षल साळवे, देवराज भालकर, ओमराज काकडे, सुजित खांदवे, रोहन बनकर, सार्थक गोरे, स्वप्नील काकडे, संकेत गवळी, कार्तिक ढोरमारे, अनन्या पाटील, प्रांजल सोनवणेयांना शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक, सहशिक्षकवृंद, शालेय वाहनचालक मालक यांची उपस्थिती होती.